
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट शताब्दी महोत्सवी वर्षा निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट शताब्दी महोत्सवी वर्षा निमित्ताने संस्थेच्या पुणे विभागीय केंद्राच्या तसेच पुना सिरोलॉजिकल ब्लड इन्स्टिट्यूट व रक्तितवर्धिनी यांच्या संयुक्तविद्यमाने दिनांक ०८ व ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाची सुरुवात शिव वंदना म्हणून करण्यात आली, पहिल्या दिवशी चव्हाण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या व स्वच्छता निरीक्षक पदविका हॉलिडे बॅचच्या विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले व दुसऱ्या दिवशी संस्थेच्या कर्मचारी अधिकारी तसेच स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. रक्तदान शिबिरासोबतच उपस्थित विद्यार्थी व कर्मचारी यांचे हिमोग्लोबिन तपासणी व रक्तगट तपासणी करण्यात आली कार्यक्रमास सर्वांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला व दोन दिवसात ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र व थोर पुरुषांचे जीवनचरित्र पुस्तक देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या पुणे विभागीय केंद्राच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले



