Site Logo
पुणेमनोरंजनमहाराष्ट्रसामाजिक

आपला म्युझिकल ग्रुपचा द्वितीय वर्धापन दिन संगीतमय वातावरणात उत्साहात साजरा.

पुणे :प्रतिनिधी

आपला म्युझिकल ग्रुप प्रस्तुत सुमधुर हिंदी मराठी गीतांचा निशुल्क संगीत मैफिलीत श्रोत्यांना चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध नव्या आणि जुन्या गीतांची मेजवानी मिळाली. यामध्ये विख्यात गायक आणि गायकांनी अजरामर केलेल्या गीतांचा समावेश असल्याने श्रोत्यांना चित्रपट संगीतातील सुवर्णकाळाची सुरेल अनुभूती मिळाली. पुण्यातील पत्रकार भवन येथे दिनांक 14 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या द्वितीय वर्धापन दिनाला प्रमुख अतिथी म्हणून हेमंतजी रासने आमदार कसबा विधानसभा तसेच पुण्यातील सुप्रसिद्ध कलाकार अनिलजी घाटगे, गफ्फार मोमीन , ललिता जगदाळे आणि मोनाली दुबे यांच्या उपस्थितीत पार पडला. अनिल घाटगे व मोनाली दुबे हे पुण्यातील सुप्रसिद्ध कलाकार यांना पुणेरी कलारत्न पुरस्कार ,मानाची पुणेरी पगडी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रसिद्ध कलाकार गफ्फार मोमीन व ललिता जगदाळे यांनाही मानाची पुणेरी पगडी देऊन सन्मानित करण्यात आले. पुण्यातील कलाकारांच्या ग्रुप मधील आदर्श जोडी म्हणून श्री व सौ जाधव ,श्री व सौ वायचळ , श्री व सौ कोसंदर , श्री व सौ ढमाले यांना सन्मानित करण्यात आले तसेच विशेष कलाकार पुरस्कार म्हणून भारती सातव व नामदेव तारू यांना सन्मानित करण्यात आले. आदर्श माता सुमित्रा हजारे व आदर्श माता पिताश्री पुरस्कार श्री आणि सौ खान यांच्यासह सर्व कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. उपस्थित प्रेक्षकांना मोगऱ्याचे रोप वाटून सर्वांना सन्मान करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजक अनिल घाडगे, उमा मेनन, सहआयोजक, रणजीत पाटील व विद्या हजारे मॅडम यांनी केले .या कार्यक्रमांमध्ये सुषमा वनारसे, किशोर गावडे ,प्रसाद माने, रविराज, आनंद गायकवाड, विजय कांबळे संजय मिश्रा, मल्लिकार्जुन बनसोडे , दुर्वेश घाडगे, रमेश लोंढे , सतीश कापडी , दत्ता लोहोर ,मंगल लोहोर हरीश शरणागत, कावेरी देशमुख, छाया अय्यर ,जयश्री सिनलकर , भारती सातव, गुलशन खान, विद्या कोकणे आदी कलाकारांनी आपले हिंदी मराठी चित्रपटातील गीते सादर करून रसिकांची मनी जिंकून घेतले आपला म्युझिकल ग्रुपचा द्वितीय वर्धापन दिन अतिशय उत्साहात पार पडला .महेश यांनी ध्वनी संयोजन केले. या कार्यक्रमाचे फोटोग्राफी दत्ता लोहार यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन रणजीत पाटील यांनी अभ्यासपूर्ण व खुसखुशीत खुसखुशीत निवेदन केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आनंद काजूलकर , उद्योजक दत्तू राठोडे, सागर मोरे, नवनाथ कोलते, प्रकाश पाटील, उत्तम पाटील, हिरामण शिनलकर यांनी विशेष सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button