ज्येष्ठ समाजसेवक, कष्टकऱ्यांचे खरे संरक्षक आणि असंघटित कामगारांच्या न्यायहक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे *डॉ. बाबा आढाव* यांचे आज सायंकाळी 8.25 वाजता दुःखद निधन झाले आहे.
महात्मा फुले यांच्या विचारांचे खरे वारसदार म्हणून त्यांनी समाजातील शेवटच्या घटकासाठी अथक लढा दिला. कष्टकरी चळवळीला दिशा, ओळख आणि ताकद देणारा हा महान आवाज आज कायमचा थांबला आहे.
त्यांच्या जाण्याने समाजकार्याचे एक युग संपले असून कष्टकरी वंचित समाजासाठी ही अपूरणीय हानी आहे. ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. समाजकार्य क्षेत्रातील आधारवड उन्मळून पडल्यासारखे आहे.
डॉ. बाबा आढाव यांच्या आत्म्यास शांती लाभो.
त्यांची विचारधारा आणि त्याग समाजाला सदैव मार्गदर्शन करत राहील.
भावपूर्ण श्रद्धांजली 🪔