*जागतिक एड्स दिनानिमित्त एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन**जागतिक एड्स दिनानिमित्त एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन*

*जागतिक एड्स दिनानिमित्त एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन*
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्ताने विभागीय केंद्र पुणे यांच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त एच.आय.व्ही. व एड्स याविषयी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून मा. डॉ.अलकनंदा वैद्य
(समन्वय अधिकारी,एच.आय.व्ही. एड्स सेंटर,जिल्हा रुग्णालय औंध, पुणे.) व कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्थेचे विभागीय संचालक मा. दगा मोरे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रमाचे प्राचार्य डॉ.संजीव गायकवाड यांनी केले,प्रमुख पाहुण्याचे स्वागत स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील पुस्तक, सन्मानचिन्ह व शाल देऊन करण्यात आले त्यांचे स्वागत संस्थेच्या उपसंचालिका (लेखा व प्रशासन) श्रीमती. अर्चना फलके यांनी केले.
कार्यक्रमात पुणे केंद्राच्या वतीने काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांसाठी “एड्स मुक्त भारत तरुणांची जबदारी” या विषयी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आला.
डॉ.अलकनंदा वैद्य यांनी आपल्या मार्गदर्शनात एच.आय.व्ही. व एड्स या रोगांविषयी माहिती देताना त्याबद्दल असलेले समज- गैरसमज, रोगांची लक्षणे, त्याची लागण होण्याची विविध कारणे, लागण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी या बाबत खूप सखोल माहिती दिली.
कार्यक्रमास संस्थेचे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रमाचे जवळपास १५० विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गोविंद सूर्यकांत नामदे यांनी केले व आभार श्रीमती.स्मिता राऊत यांनी मानले.



