Site Logo
पुणेसामाजिक

श्री स्वामी समर्थ ध्यान वाटिका मठामध्ये दत्त जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा

 

श्री स्वामी समर्थ ध्यान वाटिका मठामध्ये दत्त जयंती कार्यक्रम उत्साहात  साजरा

आपला राजस्तंभ न्युज : पुणे प्रतिनिधी
गुरुवार दि.४ डिसेंबर २०२५ रोजी श्री स्वामी समर्थ मठ ध्यान वाटिका डेक्कन जिमखाना या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष. गायत्रीताई संतोष लांडे व खजिनदार भाग्यश्री ताई लांडे, व स्वामीभक्त समीर भाऊ लांडे, यांच्या स्वखर्चाने दत्त जयंती उस्तव साजरा करण्यात आला तसेच सर्व उपस्थित सहकारी, संदेश भाऊ कदम, साहिलभाऊ सावले रोहितभाऊ जरे, सत्यम भाऊ राठोड, श्री दत्त जयंती निमित्त श्री स्वामी समर्थ मठामध्ये श्री दत्त जन्म दिवस हा खूप मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री स्वामी समर्थ मठाच्या कार्यकारी मंडळाच्या माध्यमातून त्यांनी विविध उपक्रम साजरे केले आहेत. त्यांनी गुरुवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी श्री गुरुदेव जयंती निमित्त भव्य असे कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
यामध्ये सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत अभिषेक करण्यात आला. सकाळी बारा वाजता होम हवन करण्यात आले. त्यानंतर दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत श्री गुरुदेव जन्म सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्यात आला. त्यानंतर २.३० ते ६.०० वाजेपर्यंत भजनी महिला मंडळाच्या भरगच्च असा कार्यक्रम ठेवण्यात आला.
त्यानंतर सायंकाळी ७ वाजल्यापासून भव्य अशा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे मठातील वातावरण परिसरातील दत्तभक्त या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. श्री गुरुदेव दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात आणि नियोजनबद्ध पद्धतीने साजरा केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी दत्त जयंती सोहळ्याचा कार्यक्रमाचा आनंद घेतला संस्थापक अध्यक्ष सौ गायत्री ताई संतोष लांडे ताईंचे व स्वामीभक्त समीर भाऊ लांडे यांचे परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button