
*व्यसनमुक्ती मार्गदर्शन सत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद*
दिनांक ३१/०१/२०२६
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या संस्थेच्या शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्ताने ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट विभागीय केंद्र पुणे व पी. ए. सी. इ. ग्रुप यांच्या संयुक्तविद्यमाने व्यसनमुक्ती मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. वंदना जोशी (अध्यक्ष पी. ए. सी. इ. ग्रुप ) व मा. सोमीनाथ शिंदे (स्वयंसेवक पी. ए. सी. इ. ग्रुप ) हे उपस्थित होते व कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेच्या पुणे विभागीय केंद्राच्या उपसंचालिका (लेखा व प्रशासन) श्रीमती. अर्चना फलके या होत्या व त्याच्या हस्ते प्रमुख पाहुण्याचे स्वागत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील पुस्तक, सन्मानचिन्ह व शाल देऊन करण्यात आले.
व्यसनमुक्ती मार्गदर्शन सत्राच्या सुरवातीला सोमीनाथ शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यसन म्हणजे काय, व्यसनाचे प्रकार, युवक वर्ग व्यसनाच्या आहारी का जातो व व्यसनामुळे आपल्या आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात याविषयी माहिती दिली व जर निरोगी जीवन जगायचे असेल तर सर्वांनी निर्व्यसनी राहावे असे त्यांनी आवाहन केले तसेच व्यसनमुक्तीवर आधारित असलेली ‘वळण’ ही शॉर्ट फिल्म सुद्धा उपस्थितांना दाखाविण्यात आली.
मा. डॉ. वंदना जोशी यांनी उपस्थितांना पी. ए. सी. इ. संस्थेच्या स्थापने मागचा उद्धेश सांगताना लहान वयातच मुलांना कसे व्यसाना पासून परावृत्त ठेवता येईल यासाठी प्रयत्न करणे हा त्यांचा प्रमुख उद्धेश असल्याचे सांगितले व पूर्ण जगात कर्करोग, मधुमेह, हृदय विकार या सारखे रोग हे प्रामुख्याने व्यसनामुळे होतात असे सांगितले तसेच उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, या वेळी कार्यक्रमास उपस्थित एल.एस.जी.डी. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याने आपले मत मांडताना पी. ए. सी. इ. संस्था करत असलेला कामाचे कौतुक केले व सध्याच्या तरुण पिढीस जर व्यसाना पासून परावृत्त करायचे असेल तर त्यास आध्यात्माकडे वळणे गरजेचे आहे असे मत त्याने व्यक्त केले व कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी व्यसनमुक्त राहण्याविषयी प्रतिज्ञा घेतली.
कार्यक्रमास संस्थेच्या एल.जी.एस., एल.एस.जी.डी., डी.एल.जी.एफ.एम. व स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन जवळपास १५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तसेच संस्थेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशस्वी करण्यासाठी अभ्यासक्रम समन्वयक श्री. समीर मुरुकटे व श्री. विक्रांत चावक तसेच संस्थेचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. गोविंद सूर्यकांत नामदे यांनी केले.



