Site Logo
पिंपरी चिंचवडमहाराष्ट्रसामाजिक

वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत श्री मयुरेश्वर गणेश मंदिर गणेश नगर थेरगाव या ठिकाणी दोन मोबाईल मिळाले असून ज्यांचे मोबाईल होते त्यांना वाकड पोलीस स्टेशनच्या112 नं च्या मोबाईल व्हॅन पोलीस कर्मचाऱ्यांनी योग्य ती चौकशी करून केले परत

  • शनिवार दिनांक १४/०२/२०२६ रोजी

श्री मयूरेश्वर गणेश मंदिर गणेश नगर थेरगाव या ठिकाणी सायंकाळी 5 वाजता च्या सुमारास, (मी बापू शामराव जाधव, दैनिक आपला राज्यस्तंभ) या वृत्तपत्राचा संपादक सदर गणपती मंदिराच्या समोरून भुमकर चौकाच्या दिशेने चालत जात असताना मंदिराच्या समोर कट्ट्यावरती दोन मोबाईल असल्याचे निदर्शनात आले आजूबाजूच्या काही लोकांना विचारपूस केली असता आमचा मोबाईल नाही असे सांगितले, कोणी मोबाईल घ्यायला येईल का म्हणून थोडा वेळ वाट पाहिली 15 ते 20 मिनिटानंतर एक मुलगी त्या ठिकाणी आली ती म्हणाली मोबाईल माझ्या मैत्रिणीचा आहे मला घ्यायला पाठवले आहे तोपर्यंत मी 112 नंबरला फोन करून फोनच्या विषयी माहिती दिली होती व तिथे एक मुलगी फोन घेण्यासाठी आलेली आहे तिच्या मैत्रिणीचा फोन आहे असे सांगत होती हे मी त्यांना सांगितले पण वाकड पोलीस स्टेशनच्या 112 कंट्रोल मोबाईल वरचे पोलीस कर्मचाऱ्यांनी मला हे सांगितले की आम्ही येऊपर्यंत कोणाला मोबाईल देऊ नका, त्याच्यानंतर दहा ते पंधरा मिनिटानंतर ज्यांचा मोबाईल होता त्या दोन मुली सदर ठिकाणी आल्या त्या पण मला हेच म्हणू लागल्या की आमचा मोबाईल आहे आम्हाला द्या, त्यांना मी व्यवस्थित समजून सांगितले की ताई मोबाईल तुमचा असेन मला मान्य आहे पण मी 112 नं कंट्रोलला कळवलेले आहे त्यामुळे ते पोलीस कर्मचारी येतील शहानिशा करून ते तुम्हाला मोबाईल देतील तोपर्यंत मी तुम्हाला मोबाईल देऊ शकत नाही कृपा करून पोलीस येईपर्यंत थांबा काही वेळातच वाकड पोलीस स्टेशनचे 112 नंबर कंट्रोल मोबाईल त्या ठिकाणी आली व त्यांना मी सदरची सर्व माहिती सांगितली व त्यांच्याकडे ते दोन्ही मोबाईल मी दिले व त्यांनी त्या मुलीला विचारले की तुमचे मोबाईल कुठे हरवले होते त्या मुलींनी सांगितले की आम्ही इथेच या मंदिरासमोर कट्ट्यावरती बसलो होतो आणि आमची कंपनीची गाडी आली आणि आम्ही लगेच गाडीमध्ये बसून गेलो नंतर लक्षात आले की आमचे मोबाईल बसल्या ठिकाणी च राहिले आहे म्हणून मी माझ्या मैत्रिणीला फोन शोधण्यासाठी पाठवले होते तेव्हा तिने आम्हाला फोन करून सांगितले की मोबाईल एका व्यक्तीकडे आहेत पण ते पोलीस येऊ पर्यंत देत नाही असे म्हणतात, म्हणून आम्ही पण आलोत, पोलीस शिपाई रुपेश लाडे बक्कल नंबर 3997 व पोलीस शिपाई श्रीकांत जगताप बक्कल नंबर 3430 यांनी मिळून आलेल्या मोबाईलची मालक तिचाच मोबाईल आहे का पूर्णपणे व्यवस्थित चौकशी केल्यानंतर तिला तो मोबाईल त्यांनी दिले असता, ज्यांचे मोबाईल होते त्यांना परत आपण व्यवस्थितपणे कायदेशीरत्या त्यांना परत दिल्याचा मला समाधान मिळाले व वाकड पोलीस स्टेशनच्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी वेळेवर येऊन योग्य ती कामगिरी केल्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद देतो या आजच्या झालेल्या या प्रकरणातून मी जनतेला एकच सांगू इच्छितो की अशी कुठेही बेवारस वस्तू आपल्याला दिसून आल्यास प्रथम जवळच्या लोकांना विचारपूस करावी व नंतर त्वरित पोलिसांना कळवावे जोपर्यंत पोलीस येत नाहीत तोपर्यंत परस्पर कोणालाही ती वस्तू देऊ नये पोलिसांनी त्या वस्तूचे किंवा त्या वस्तूच्या मालकाचे योग्य ती चौकशी करूनच कायदेशी रित्या ते देतील, धन्यवाद🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button