यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्यापदवी पदवी वितरण समारंभ उत्साहात

पदवी वितरण समारंभ उत्साहात
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अशोका इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च द्वारा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्मेंट, पुणे (अभ्यासकेंद्र क्र.६२२५८) येथील अभ्यासकेंद्रावर डिसेंबर २०२४ व मे २०२५ रोजी उत्तीर्ण झालेल्या बी.ए., बी.कॉम., एम.बी.ए., बी.लिब., एम.लिब., एम.ए., पत्रकारिता पदविका या अभ्यासक्रमांचा पदवी वितरण समारंभ अगदी उत्साहात पार पडला, कार्यक्रमाची सुरवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली, सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. व्ही. बी. गायकवाड (विभागीय संचालक,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्र पुणे), प्रमुख पाहुणे म्हणून अभ्यासकेंद्राचे माजी विद्यार्थी श्री. सचिन मोरे पाटील (नगरसेवक पुणे महानगरपालिका) व प्रा.डॉ.सुनील धनगर (लेखक व वक्ता) उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय संचालक मा.श्री.दगा मोरे यांनी केले व संस्था शतक महोत्सवी वर्षा साजरे करत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात डिसेंबर २०२४ व मे २०२५ रोजी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी व पदविका प्रदान करण्यात आल्या.
मा.श्री. सचिन मोरे पाटील यांनी पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. प्रा.डॉ.सुनील धनगर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण सर्वांनी कायम शिकत राहिले पाहिजे, एक पदवी प्राप्त केली की, न थांबता पुढील अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावा व सोबतच एखादे कौशल्य ही आत्मसात करावे असे सांगितले तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने काम करता करता शिक्षण घेण्यासाठी जी संधी सर्वासाठी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आभार मानले.
प्रा.डॉ.व्ही.बी.गायकवाड यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना विद्यापीठात सुरू असलेल्या विविध अभ्यासक्रमाबद्दल माहिती दिली व नवीन शैक्षणिक धोरणामुळे आता एका वेळी दोन पदवी किंवा पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेता येणार असल्याचे सांगितले व दिनांक २३ मार्च २०२६ रोजी पुण्यातील बालेवाडी येथे विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यास सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले तसेच कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमास श्री.दत्तात्रय ठोसर, श्री.विक्रांत चावक, श्री.दिलीप भोसले, श्री.सुर्यकांत शिंदे, श्री.सागर घेवडे, श्री.समीर मुरुकटे, श्री. जागृत पाटील, साक्षी कोकाटे, श्री.संजय गौड, शुभम जाधव, रोहित फडतारे आदी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रसंयोजक श्री. गोविंद सुर्यकांत नामदे यांनी केले व श्री. दिनकर बुरुंगळे आभार मानले.



