Site Logo
गुन्हेगारीपुणेमहाराष्ट्र

19 वर्षीय नर्सिंग विद्यार्थीनीने आपलं स्वतःच जीवन संपवलं, सुसाईड नोट मुळे उडाली खळबळ

पुणे: प्रतिनिधी :
पुण्यात मनाला हाधरून टाकणारी घटना! 19 वर्षीय नर्सिंग विद्यार्थीनीने आपलं स्वतःच जीवन संपवलं,
पुण्यातून धक्का देणारी घटना समोर आली आहे. एका 19 वर्षीय नर्सिंग विद्यार्थीनीला तिच्या मैत्रिणींच्या मानसिक छळाला कंटाळून जीवन संपवलं. पायल किशोर राजगुरू असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. ही घटना पुण्यातील चंदननगर परिसरात घडली. याप्रकरणी पायलच्या तीन मैत्रिणींविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळं पायलच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांना तपासादरम्यान मृत पायलकडे सुसाईड नोट मिळाली. असून पायलने तिचे रुममेट्स आणि मैत्रिणींवर गंभीर आरोप केल्याचं या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय आहे तिच्या मैत्रिणी तिचा सतत मानसिक छळ करायच्या, असं पायलने सुसाईड नोटमध्ये लिहिल्याची माहिती समोर आली आहे. मृत पायलने सुसाईड नोटमध्ये आरोप केले आहेत की, तिच्या मैत्रिणी खूप दिवसांपासून तिचा मानसिक छळ करायच्या. समाजात बदनामी केल्याचा आरोपही तिने केला आहे. तसच आई-वडिलांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप पायलने केला आहे.या धमक्या आणि मानसिक त्रासाला कंटाळून पायलने आपलं स्वतःचं आयु्ष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button