Site Logo
गुन्हेगारीपुणेमहाराष्ट्र

सराईत गुन्हेगाराकडून पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त- देहूरोड पोलिसांची कारवाई

सराईत गुन्हेगाराकडून पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त- देहूरोड पोलिसांची कारवाई

देहूरोड: प्रतिनिधी दिनांक १ ऑगस्ट २०२६
देहूरोड पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत सराईत गुन्हेगाराला देशी बनावटीच्या पिस्टलसह जिवंत काडतूसासह ताब्यात घेतले. या कारवाईमुळे संभाव्य घातपाताचा कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

अरबाज उर्फ बिल्ला युसुफ खान (वय २४, रा. शितळानगर, थॉमस कॉलनी, मामुर्डी, ता. हवेली, जि. पुणे) असे ताब्यात घेतलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की एक तरुण पिस्टल व जिवंत काडतूस बाळगून संशयास्पदरीत्या फिरत आहे .माहितीचे गांभीर्य ओळखून देहूरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्याचा शोध घेत शुक्रवारी ( दि.१ ) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास देहूरोड येथून साईनगरकडे जाणाऱ्या ( मुरुगन टेम्पल ) मार्गावर सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडतीदरम्यान त्याच्याकडून सुमारे ५२ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
अरबाज खान हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी देहूरोड पोलीस ठाण्यात पाच, खडकी व वाकड पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक,असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अक्षय जाधव, पोलीस उपनिरीक्षक लखनकुमार वाव्हळे, पोलीस हवालदार किरण खेडकर, सुरेश ढवळे, पोलीस शिपाई प्रशांत माळी, पंकज भदाणे, शुभम बावनकर, धीरज अंभोरे, मोमीन शेख आणि संतोष महाडिक यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button