Site Logo
गुन्हेगारीपुणेमहाराष्ट्र

पोलीस कर्मचाऱ्याने चोराचा पाठलाग करून गाडीसह चोर पोलिसांच्या ताब्यात लोणी काळभोर पोलीस स्टेशनची घटना

अनेक वेळा आपण ऐकला असेल पोलिसांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता चोराचा पाठलाग करून गाड्या व चोरासहित  हस्तगत केल्याचे,अशीच एक घटना काल १९ मे रोजी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली 

आज रोजी काल दिनांक १९/०५/२०२६ रोजी २१.00 ते आज दिनांक २०/०५/२०२६ सकाळी 9.00 वाजेपर्यंत आम्ही स्वतः HC ११४१ ढाकणे, PC ८९९५ कांबळे असे रात्रपाळी थेऊर फाटा येथे कर्तव्यास असताना सकाळी ८. ४० वाजता MH 14 ED 9005 ही पांढऱ्या रंगाची एक्टिवा गाडी चोरून एक इसम सोलापूर दिशेने जात आहे. असा कॉल मिळाला त्याच वेळी दिवसपाळी अंमलदार Hc ६७३३ सुलाखे हजर झाले होते आम्ही तिघांनी त्यास सदर गाडी दिसून येताच त्यास थांबण्याचा इशारा केला असता तो पळून जाऊ लागला त्यावेळी सदर इसमाचा आम्ही आमच्या टू व्हीलर ने पाठलाग केला असता सदर आरोपी रस्त्याच्या कडेला गाडी सोडून सैरावैरा पायी पळू लागला. आम्ही आमची गाडी साईडला लावून त्याचा पायी पाठलाग केला त्यावेळी तो एका ठिकाणी पळताना पडला त्याच वेळी आम्ही त्यास पकडले व लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे जाऊन सदर चोरीला गेली गाडी व गाडी चोरून घेऊन जाणारा इसम त्यांच्या ताब्यात दिले या सर्व कर्मचाऱ्यांच बहादुरी बद्दल खूप खूप अभिनंदन पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा 🙏💐

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button