सोलापूर रोड लोणी काळभोर कॉर्नर गॅस कंटेनर व दुचाकी स्वार यांच्यात जोरदार धडक दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू

पुणे :प्रतिनिधी आपला राजस्तंभ वृत्तसेवा
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक 19 मे 2026 सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर कॉर्नर पुणे सोलापूर रोड वरती सोलापूरच्या दिशेने जात असलेला गॅस वाहतूक करणारा कंटेनर व दुचाकी स्वार यांच्यात जोरदार धडक झाल्याने दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव तानाजी विश्वनाथ काळभोर (वय 65 रा. पांडवदंड रोड कद माकवस्ती ता. हवेली )असे असून त्यांच्या दुचाकी गाडीचा क्र. (MH 12 LM 2870) असून आपल्या काही कामासाठी नेहमीप्रमाणे त्या चौकातून ते जात असताना हा अपघात झाल्या मुळे ते खाली पडले व पाठीमागचं चाक दुचाकी स्वराच्या डोक्यावरून गेले असता जागीच मृत्यू झाला
अपघाताची काळभोर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे कर्मचारी व हडपसर पोलीस स्टेशनचे वाहतूक कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असता पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून कंटेनर रस्त्याच्या मध्ये असल्यामुळे सोलापूर रोड वरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती वाहतूक कर्मचाऱ्यांनी पहिला कंटेनर बाजूला घेतल्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यात साठी खूप शर्तीचे प्रयत्न करून वाहतूक सुरळीत केली अपघाताच्या ठिकाणी अपघात पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती ज्या ठिकाणी अपघात झाला तो चौक नेहमी कसबजलेला रहदारीचा असतो पुढील तपास लोणी काळभोर पोलीस स्टेशन करीत आहे



