आपला राजस्तंभ न्यूज : प्रतिनिधी
पुण्यामध्ये तीन मेट्रो स्थानकाच्या नावात बदल करण्यात आलेला आहे नवीन नावाचे फलक थोड्या दिवसात बसवण्याचं काम पूर्ण होणार आहे अनेक संघटनाच्या मागणीनंतर हे नाव बदलण्यात येणार आहेत पुणे मेट्रो प्रकल्पातील तीन स्थानकाच्या नावांमध्ये बदल करण्यात येणार आहे, मंडई मेट्रो स्थानकाचे नाव, महात्मा फुले मंडई, करण्यात येणार आहे, दुसरे नळ स्टॉप स्थानकाचे नाव बदलून,एसएनडीटी स्थानक करण्यात आले आहे, तिसरे आयडियल कॉलनी स्थानकाचे नाव बदलून, पौड फाटा स्थानक असे करण्यात आलेले आहे पुढील काही दिवसातच नवीन नावाचे फलक लावण्याचे काम पूर्ण होणार आहे असे मेट्रो प्रशासना कडून माहिती मिळाली आहे,