Site Logo
पुणेमहाराष्ट्र

जड वाहनांना जाण्यास बंदी असताना वाहतूक पोलिसांनी जाऊ दिले नाही म्हणून शिवीगाळीची भाषा करणारा दारू पिलेला ट्रक ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात

लोणी काळभोर : प्रतिनिधी
दिनांक १७ एप्रिल संध्याकाळी ८ वाजण्याच्या सुमारास थेऊर फाटा या ठिकाणी घडलेली घटना,
थेऊर फाट्याकडून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावरती जड वाहनांना बंदी घालण्यात आलेली असताना एक १४ चाकी ट्रक पुण्याच्या दिशेने जात असताना थेऊर फाटा चौकामध्ये वाहतूक कर्मचारी दोन महिला कर्मचारी व चेतन सोलाखे हवालदार असे तीन कर्मचारी त्या चौकामध्ये कार्यरत होते हवालदार चेतन सोलाखे यांनी मोठ्या ट्रक ड्रायव्हरला सांगितले की पुण्याकडे जाणाऱ्या जड वाहनांनाया वेळेला बंदी आहे तू रात्री अकरा ते पाच या वेळेत जाऊ शकतोस,तर त्या पोलीस कर्मचाऱ्यांचे काय चुकलं आपण फक्त पोलिसांना दोष देतो पण आपल्या चुका आपण कधीही लक्षात घेत नाही हे जनतेने लक्षात ठेवा सर्वच वाईट नसतात आपण जर वाहतूक नियमाचे पालन केलं तर मग ते कशाला आपल्याला बोलतील हे आपणही लक्षात ठेवायला पाहिजे या बातमीच्या माध्यमातून मी जनतेला एवढेच सांगतो की आपण वाहतूक नियमाचे पालन करावे,…🙏 तो ड्रायव्हर म्हणाला हे बाकीचे गाड्या का जातात ते म्हणाले बाकीचे हे जे जातात हे लोक इथले लोकल आहेत त्यांना इथे पुढे २ ते ३ किलो मिटर पर्यन्त जाणारी असतात, त्या ट्रक ड्रायव्हरने पुढे जाऊ दिले नाही म्हणून मनात राग धरून  त्याने साईडला गाडी लावली व तो दारू पिऊन तिथे उभा असलेली एक टू व्हीलर ती गाडी खाली पाडून तिचे हेडलाईट तुटली, वाहतूक कर्मचाऱ्याला उद्धटपणे, भाषा व शिवीगाळ करायला लागल्यामुळे चेतन सोलाके हवालदार यांनी त्याला विचारपूस केले असता दारू पिलेल्या ड्रायव्हरने त्यांनाही शिवीगाळ व मारण्यासाठी दगड उचलण्याचा प्रयत्न केला जर का दारू पिलेल्या व्यक्तीने पोलीस कर्मचाऱ्याला दगड मारला असता आणि मोठी इजा झाली असती तिथे दोन महिला कर्मचारी पण होत्या असे पुन्हा प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने अशा व्यक्ती वरती कठोर कारवाई करावी अशी जनतेची मागणी आहे त्या ठिकाणी असा प्रकार पाहता अनेक लोक जमा झाले होते, हवालदार सोलाखे यांनी ११२ मार्शल ला कळवले असता त्वरित मार्शल येऊन दारू पिलेल्या ड्रायव्हरला ताब्यात घेतले पुढील कारवाई लोणी काळभोर पोलीस स्टेशन करत आहे विशेष म्हणजे एकतर थेऊर फाटा या चौकामध्ये सिग्नल बसवलेले आहेत पण अनेक दिवसापासून चालू नाही, ते बंद आहेत तिथल्या काही नागरिकांना विचारले असता त्यांनी असे सांगितले की बऱ्याच दिवसापासून सिग्नल बंद आहेत, का.? बंद आहेत प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित हा वाहतूक सिग्नल चालू करण्यात यावे अशी लोकांची मागणी आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button