कोथरूड प्रतिनिधी :10/12/025
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब गट प्रभाग क्रमांक 30 वारजे कर्वेनगर होम कॉलनी मी अनिल तावरे या प्रभागा मध्ये अनेक वर्षांपासून राहत आहे तरी या प्रभागातील कोणते ही सार्वजनिक काम असो किंवा व्यक्तीगत काम असो धावून जाऊन पुढे होऊन मी ते काम केलेलं आहे
माझ्या कामाचा पाया म्हणजे, विश्वास, पारदर्शकता, आणि प्रामाणिकपणा राजकारण हे माझ्यासाठी सत्तेचा साधन नसून सेवेत वाहिलेलं आयुष्य आहे आज आपल्या प्रभागात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत याला उत्तर देण्यासाठी मी आपल्या प्रभागामधून उमेदवार म्हणून उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे माझी ताकद म्हणजे तुमचा विश्वास आहे आपल्या प्रभागामध्ये सर्व स्तरातील नागरिकांनी मिळून एकत्रितपणे विकासाचा नवा अध्याय लिहावा ही माझी मनापासून इच्छा आहे मी या निवडणुकीत कोणाच्या विरोधात नव्हेतर आपल्या प्रभागाच्या विकासासाठी व भावी पिढीच्या उज्वल भविष्यासाठी आपला उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 30 मधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे विकासाला चालना मिळविण्यासाठी, मी सदैव प्रयत्नशील राहील त्यासाठी आपण मला मतरुपी आशीर्वाद द्यावे ही विनंती