आंबेडकर सांस्कृतिक विस्तारीकरण भवन साठी तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या काळामध्ये आरक्षित करण्यात आली होती तसा सांस्कृतिक झोन पुणे महानगरपालिका व राज्य शासनाकडे नोंद झाली आहे. ही जागा सांस्कृतिक स्मारक विस्तारीकरण साठी मिळावी या मागणीसाठी आंबेडकर चळवळीचे गेले वर्षभर आंदोलन सुरू होते. यापूर्वी पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ त्यांच्या कार्यालयावर हि आंदोलन झाले होते. परंतु गेल्या दि 18 नोव्हेंबर 2025 रोजी कॅबिनेट बैठकीत उपमुख्यमंत्री तथा या खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी ससून समोर या जागेवर कर्करोग रुग्णालय बांधण्यासाठी प्रस्ताव मंजूर केला अशा बातम्या माध्यमांमध्ये आल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना भवन समोर, स्वारगेट सारसबाग पुणे येथे निषेध आंदोलन आज समितीच्या वतीने समन्वयक शैलेंद्र मोरे, दीपक गायकवाड, नीता अडसुळे, स्वाती गायकवाड, अर्चना केदारी, सिद्धार्थ ओव्हाळ,निखिल दुर्गाई, सचिन साठे, आशुतोष भोसले, अनुराधा बनसोडे, जीवन घोंगडे, आनंद घेडे, जुलेखा खान इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवसेना भवन स्वारगेट येथे मोठ्या संख्येने उपस्थित झाल्यानंतर शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या विधान परिषद उपसभापती डॉ. नीलमताई गो-हे यांनी आंदोलकांना शिवसेना भवन येथे चर्चेला बोलवून सदर प्रकरण सविस्तरपणे समजून घेऊन चर्चा केली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोन द्वारे चर्चा केली आणि आंदोलकांच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. तसेच दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी नंतर मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी स्मारक जागे संदर्भात स्वतंत्र बैठक समितीच्या आंदोलकांन सोबत होणार आहे. एम एस आर डी सी ची जागा हि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक विस्तारीकरण भवनलाच मिळेल यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचे डॉ. नीलम गो-हे यांनी आंदोलनातील शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे. सदर जागे संदर्भातील पुणे जिल्हा प्रशासकीय स्तरावर काय परिस्थिती आहे याकरता उद्या पुणे येथील विभागीय महसूल आयुक्त यांच्याकडे उद्या बैठक लावली असून या बैठकीला आंदोलकांनाही बोलवण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक विस्तारीकरचा मार्ग या चर्चेमुळे सोपा झाला असल्यामुळे आंदोलकांनी समाधान व्यक्त केले आहे. परंतु सदरची जागा पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी सांस्कृतिक स्मारक विस्तारीकरण ला मिळावी असा लेखी अध्यादेश शासन स्तरावरून निघावा तसेच एन जी वेंचर आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यामध्ये झालेला करार शासनाने त्वरित रद्द करावा हा प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू होणार आहे. या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तो पर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सुरू असलेले जन आक्रोश आंदोलन सुरू राहणार आहे हा समितीने चर्चे दरम्यान निर्धार व्यक्त केला आहे. शिवसेना भवन पुणे येथील चर्चाही सकारात्मक सांस्कृतिक स्मारकाचा विषय पुढे गेल्यामुळे आंदोलकांचा लढा अंशतः यशस्वी झाला असे आंदोलकांनी आपले मत व्यक्त केले आहे.