ऑटो-टॅक्सी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबासाहेब कांबळे यांचा वाढदिवस साजरा

पिंपरी प्रतिनिधी : दि.2 डिसेंबर 2025
राष्ट्रीय अध्यक्ष :ऑटो, टॅक्सी, बस, ट्रक, ट्रान्सपोर्ट फेडरेशन संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रिक्षा पंचायत, कष्टकरी कामगार पंचायत, टपरी, कथारी, हातगाडी, पंचायत हमाल माथाडी कामगार पंचायत, बांधकाम मजूर,व ठेकेदार संघटना,डॉ.बाबासाहेब कांबळे यांचा आज सर्व कार्यकर्ते व मित्रमंडळी, व पदाधिकारी समेत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

समाजसेवक वाळके अण्णा यांनी डॉ. बाबासाहेब कांबळे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, आपण सगळे एकत्र येऊन समाज कार्य करत राहू आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचा आभारी आहे, असे डॉ.बाबासाहेब कांबळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले, उपस्थित सामाजिक कार्यकर्ते तिम्मा टाकळे, भिमशाही युवा संघटना संस्थापक, शिवशंकर उबाळे समाजसेवक कमलेश वालके, आकाश कांबळे, नितीन कसबे, हे उपस्थित होते



