Site Logo
पुणेमहाराष्ट्रसामाजिक

कल्पनाताई बहिरट नगरसेविका पुणे महानगरपालिका यांच्या हस्ते, गायक कलाकारांना पुणेरी कलारत्न पुरस्कार व अनेक पुरस्काराणे सन्मानित

 

अनिल घाडगे
आयोजक

काल दिनांक 21 मार्च 2026 रोजी संतमाई सभागृह, काँग्रेस भवन शेजारी, शिवाजीनगर , पुणे येथे सदाबहार हिंदी मराठी गीतांचा संगीतमय कार्यक्रम अतिशय छान, सुंदर , उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. हर दिल जो प्यार करेगा … या शिर्षकाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री. अनिल घाडगे, आयोजक, आणि उमा मेनन, आयोजिका, विजय कांबळे, सहआयोजक यांनी मिळून कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांना जयश्री शिनलकर यांचे विशेष सहकार्य लाभले.आपला म्युझिकल ग्रुप या म्युझिकल ग्रुपचा हा 33 वा भाग होता यापूर्वीचे या ग्रुपचे सर्व कार्यक्रम प्रचंड यशस्वी झालेले आहेत आणि हा भाग 33 वा भाग देखिल याला अपवाद नव्हता किंबहूना हा भाग आतापर्यतच्या सर्व भागांपेक्षा चांगला आणि अप्रतिम झाला. अतिशय छान छान गाणी होती. आयोजक अनिल घाडगे यांनी अतिशय छान, श्रवणिय, प्रचंड लोकप्रिय झालेली जूनी आणि नवीन गाणी निवडली होती. अनिल घाडगे हे केवळ एक आयोजकच नसून एक चांगले गायक आहेत. Versatile Singer म्हणून त्यांचा नांवलौकिक आहे आणि त्यांनी त्यांचा स्वतःचा स्वतंत्र प्रेक्षक वर्ग निर्माण केलेला आहे* . ग्रुपच्या नावातच आपला म्युझिकल ग्रुप आहे त्यामुळे आयोजक अनिल घाडगे यांना सर्व आपलेच वाटतात आणि हे साहजिकच आहे कारण अनिल घाडगे* यांचा अतिशय प्रसन्न, हसरा चेहरा आणि मनमिळावू स्वभाव आणि सर्व कलाकारांना आपलेसे करण्याची वृत्ती आणि आलेल्या रसिकांचेही अगदी मनमोकळेपणाने, विनम्रतेने आणि हसतमुख स्वागत करणे त्यामुळे आपोआपच रसिकांना ते आपलेसे करुन घेतात.अनिल घाडगे* यांना *सामाजिक बांधिलकी* सुद्धा आहे त्यामुळे समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या अलौकिक भावनेतून ते नेहमी सामाजिक उपक्रम राबवत असतात आणि समाजात एक चांगला संदेशही देतात त्यांच्या या सामाजिक कार्यास सलाम
या कार्यक्रमात स्वतः आयोजक व गायक अनिल घाडगे , सहआयोजक विजय कांबळे, के. संग्राम, किशोर गावडे,रविराज, सतिश कापडी, रमेश लोंढे, प्रसाद माने, नामदेव तारु,दिनकर चंदनशिवे, आणि कविवर्य, गजलाकार आणि गायक आनंद गायकवाड हे सर्व पुरुष गायक आणि महिला गायिकांमध्ये आयोजिका उमा मेनन, जयश्री शिनलकर , छाया अय्यर, विद्या कोकणे,माधूरी ताटकर, सरिता बायस्कर , शिल्पा निफाडकर, सुषमा वनारसे, या महिला गायिका हे सर्व सहभागी झाले होते*. *या कार्यक्रमासाठी पुण्यातील सर्वाधिक लोकप्रिय ,आघाडीची, अग्रगण्य आणि सर्व गायिकांची गाणी लिलया गाणारी, पुण्यातील रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेली Versatile Singer ललिता जगदाळे यांना आमंत्रित करण्यात आले होते* .सर्व गायक आणि गायिका अतिशय प्रतिभाशाली,गुणी आणि गाण्यात निष्णात होते. कोणत्याही एका गायकाची अन्य गायकाशी तुलना करणे संयुक्तिक होणार नाही किंबहूना त्यांच्या प्रतिभेला अव्हेरणे होईल. सर्वांनीच आपापली गाणी खुपच छान आणि अप्रतिमपणे सादर केली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. *सहभागी सर्व गायक आणि गायिका यांचे विशेष आणि हार्दिक अभिनंदन
या कार्यक्रमासाठी पुणे महानगर पालिकेच्या नवनिर्वाचित , धडाडीच्या, कार्यप्रवण आणि क्रियाशील नगरसेविका सौ.कल्पनाताई बहिरट आणि त्यांचे पती यांनी या कार्यक्रमाला हजर राहून या संगीतमय कार्यक्रमाचा आस्वाद आणि आनंद घेतला*. *आपला म्युझिकल ग्रुपचे आयोजक आणि गायक अनिल घाडगे यांनी श्री. बहिरट यांचा शाल, ट्राँफी आणि बुके देवून सत्कार केला. सौ. कल्पनाताई बहिरट , नगरसेविका यांचा सत्कार आयोजिका उमा मेनन आणि सौ. जयश्री शिनलकर यांनी शाल, बुके आणि ट्राँफी देवून केला. या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना सौ. कल्पनाताई बहिरट यांनी आपल्या म्युझिकल ग्रुपचे आयोजक अनिल घाडगे आणि संपूर्ण टिमचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे आपला म्युझिकल ग्रुपच्या वतीने सुप्रसिद्ध उद्योजक नवनाथ कोलते यांचा सत्कार सहआयोजक विजय कांबळे आणि अक्षता मेलोडीज- सौ. अपर्णा काजुळकर म्युझिकल ग्रुपचे सह आयोजक आणि सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद काजुळकर यांच्या हस्ते शाल, ट्राँफी आणि बुके देवून करण्यात आला
आपला म्युझिकल ग्रुप प्रत्येक कार्यक्रमात विशेष कलाकारांची निवड करुन अशा कलाकारांना विशेष कलाकार पुरस्काराने सन्मानित करतात*. आता याच पार्श्वभूमीवर त्यांनी मागील भागापासून पुण्यातील *संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानासाठी *पुणेरी कलारत्न पुरस्कार* या नावाने पुरस्कार देवून सन्मानित करणार आहेत आणि या पहिल्याच *महिला गायिका पुरस्काराच्या मानकरी पुण्यातील सर्वाधिक लोकप्रिय आणि आघाडीच्या गायिका ललिता जगदाळे या ठरल्या. ललिता जगदाळे यांचा सत्कार पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. कल्पनाताई बहिरट, उमा मेनन आणि आयोजक अनिल घाडगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. ललिता जगदाळे यांना पुणेरी पगडी, शाल आणि बुके देवून सन्मानित करण्यात आले. पुणेरी कलारत्न पुरस्काराची सुरुवात झाल्यानंतर हा दुसरा पुरस्कार आहे. पहिला पुणेरी कलारत्न पुरस्कार Voice of KishorKumar असलेले सचिन सोनटक्के हे ठरले होते. ललिता जगदाळे यांना पुणेरी कलारत्न पुरस्कार प्रदान केल्यानंतर उपस्थित असलेल्या सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत आणि अभिनंदन केले. आपला म्युझिकल ग्रुप प्रत्येक भागात सहभागी कलाकारांपैकी काही कलाकारांना विशेष कलाकार पुरस्काराने सन्मानित करतात. या भागाचे मानकरी गायिका विद्या कोकणे आणि गायक के. संग्राम हे निवडण्यात आले होते. त्यांचा सत्कार शाल, ट्राँफी देवून आपला म्युझिकल ग्रुपचे आयोजक अनिल घाडगे आणि सह आयोजक विजय कांबळे यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व गायक , गायिका, तंत्रज्ञ , फोटोग्राफर यांचा सत्कार ट्राँफी देवून सौ. कल्पनाताई बहिरट , नगरसेविका यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला भूगोल फाउंडेशनचे उपाध्यक्ष अनिल जगताप व अजिंक्य पोटे हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते त्यांचा सत्कार आयोजक अनिल घाडगे यांच्या शुभहस्ते शाल आणि बुके देवून करण्यात आला. या प्रसंगी आयोजिका उमा मेनन, सह आयोजक विजय कांबळे आणि विशेष सहकार्य करणाऱ्या जयश्री शिनलकर या मंचावर उपस्थित होत्या
या कार्यक्रमाचे *निवेदन अमितराज दोडके यांनी छान पार पाडले. निवेदक अमितराज दोडके यांनी अतिशय छान, ओघवत्या शैलीत,मधाळ आवाजात, संयमितपणे, अभ्यासपूर्ण पद्धतीने आणि रसिकांना खिळवून ठेवणारे निवेदन सादर केले. निवेदक अमितराज दोडके यांनी प्रत्येक गायक आणि गायिका यांची ओळख रसिकांना करुन दिली आणि त्यांच्या कामकाजाची आणि गाण्यांच्या छंदाचीही माहीती दिली. अप्रतिम निवेदनाबद्दल अमितराज दोडके यांचे हार्दिक आणि विशेष अभिनंदन
या कार्यक्रमासाठी  साऊंड सिस्टीम्स आणि व्हिडीयोग्राफी महेश यांनी खुपच छान हाताळली*..फोटोग्राफर बाबूराव सुगंधी यांनी सर्व कलाकारांच्या,प्रेक्षकांच्या सुंदर भावमुद्रा त्यांच्या कँमे-यामधून टिपल्या. *सर्व तंत्रज्ञांचे हार्दिक आणि विशेष अभिनंदन.
आपला म्युझिकल ग्रुपच्या विद्यमाने प्रत्येक कार्यक्रमात विशेष कलाकार पुरस्कार आणि सहभागी सर्व कलाकारांना,अतिथींना आणि प्रमुख पाहूण्यांना ट्राँफींचे वितरण करण्यात येते. या ट्राँफी कोणत्याही व्यावसायिक दुकानातून बनवून न घेता एक सामाजिक बांधिलकी म्हणून एका दिव्यांग कलाकार दांम्पत्यांना रोजगार मिळावा हा उदात्त भावनेतून आणि माफक दरात या ट्राँफी बनवून घेतल्या जातात. राधाकृष्ण आर्ट, वाकड, येथील दिव्यांग पती पत्नी या ट्राँफी स्वतः बनवतात. गाडेकर असे त्यांचे नांव असून त्यांचा वाकड येथे अशा ट्राँफी बनवण्याचा कारखाना आहे.ज्या आयोजकांना अशा प्रकारच्या ट्राँफी बनवून हव्या असतील तर त्यांनी कृपया अनिल घाडगे, आयोजक, आपला म्युझिकल ग्रुप यांच्याशी संपर्क साधावा असे त्यांच्या कडून आवाहन करण्यात आले आहे
एका अविस्मरणीय कार्यक्रमाची नोंद झाली. अनावधानाने जर कोणाच्या नावाचा उल्लेख राहीला असेल तर क्षमस्व!! धन्यवाद

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button