मा. कुलगुरू डॉ संजीव सोनवणे यांनी साधला विद्यार्थी व युवकांशी संवाद

मा.डॉ. संजीव सोनवणे (कुलगुरू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक) यांनी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्मेंट पुणे (६२२५८) या अभ्यासकेंद्रास भेट देऊन अभ्यासकेंद्रावर उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर मार्गदर्शन केले तसेच परीक्षा पद्धती, परीक्षा नियोजन, निकाल व शिक्षण व्यवस्थेत युवकांना अपेक्षित नाविन्यपूर्ण सुधारणा अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला, विद्यार्थ्यांनीही दिलखुलासपणे मा. कुलगुरूंना नवीन शैक्षणिक धोरणा विषयी विविध प्रश्न विचारून त्यांना असलेल्या शंकांचे निरसन केले. मा. कुलगुरूंनी विद्यापीठ राबवित असलेल्या विविध अभ्यासक्रमाबाबत माहिती दिली व तसेच त्या अभ्यासक्रमाचे महत्त्व ही पटवून सांगितले. काही विद्यार्थ्यांनी चर्चा करताना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात आमूलाग्र बदल झाल्याचे ही सांगितले व विद्यापीठ करीत असलेल्या कार्याचे कौतुक ही केले. मा. कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी संस्थेच्या शताब्दी महोत्सवी वर्षा निमित्ताने शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांना ही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्मेंट संस्थेच्या वतीने मा. कुलगुरू डॉ संजीव सोनवणे याचा सन्मान केंद्रसंयोजक व विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला त्यांना शॉल, पुणेरी पगडी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित पुस्तक व शताब्दीची वाटचाल पुस्तक देण्यात आले.
सदर कार्यक्रमास मा.डॉ. व्हि. बी. गायकवाड (विभागीय संचालक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्र पुणे), गोविंद सूर्यकांत नामदे (केंद्रसंयोजक ६२२५८) तसेच प्रा.दत्तात्रय ठोसर, सूर्यकांत शिंदे, संजय गौड व शुभम जाधव आदी उपस्थित होते.



