रामराज्य प्रतिष्ठान गोकुळ नगर वारजे माळवाडी येथे रामनवमी उत्साहात साजरी.

रामराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने सालाबादप्रमाणे रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले सदर उत्सवा अंतर्गत दिनांक २६/०३/२०२६ रोजी जांभुळवाडी येथील गोशाळेत चारा वाटप करण्यात आले व भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. शोभा यात्रेची सुरवात भगवान श्रीराम यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली सदर शोभा यात्रेस मा श्री. सचिन दोडके यांनी उपस्थिती लावली तसेच दिनांक २७/०३/२०२६ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रामराज्य प्रतिष्ठान चे संस्थापक तेजस (अण्णा) जडितकर तसेच अथर्व (शेठ) ढमाले, विशाल संकपाळ,अक्षय हवाले, मुकुल आवटे बस्वराज मिलकरे, प्रशांत संकपाळ, कृष्णा कवडे, अतुल मालपोटे, अविनाश संकपाळ, सोहम बानगुडे, शुभम जाधव, व्यंकटेश जडितकर , सुशील मालपोटे, आकाश बानगुडे करण देवरे अर्जुन देवरे धनराज मिरकले, यश धीरे रवी प्रक्षाळे अक्षय सोनाळे या सर्वांनी प्रयत्न केले.



