अप्पर इंदिरानगर भागात अचानक मंडपाच्या साहित्याला लागलेली भीषण आग

दैनिक आपला राजस्तंभ.न्यूज: पुणे प्रतिनिधी मंगळवार दिनांक १२ मे २०२६ दुपारी २ दरम्यान
अपर इंदिरानगर पुणे येथे अप्पर डेपो जवळील भागात मंडपाच्या साहित्याला अचानक लागलेल्या आग व अनेक स्प्लेंडर चे स्फोट व सात ते आठ टू व्हीलर गाड्या जळून खाक प्रथम अंदाज वर्तवला जात आहे मंडपाच्या गोडाऊनमध्ये अनेक साहित्य ठेवले असता ते जळून खाक झाले आहे ते मटेरियल ने आन करण्यासाठी बाहेर टेम्पो उभा असल्याने टेम्पो ही जळून खाक झालेला दिसत आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आग वाढण्याची शक्यता होती मात्र पोलीस यंत्रणा व सात ते आठ गाड्या अग्निशमन दलाच्या घटनास्थळी पोहोचल्यामुळे अग्निशम जवानाने शर्तीचे प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आली व आग बुजवण्यास यश प्राप्त झाले आहे मोठी हानी होण्यापासून अनर्थ टळला सुदैवाने जीवित हानी नाही, अद्याप आगीचे कारण मात्र समजले नाही पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे .




