पुणे स्टेशन परिसरामध्ये सेंटर हॉटेल च्या मागे ठेवलेल्या काही गाड्यांना अचानक
पुणे :प्रतिनिधी
सोमवार दिनांक 18 मे 2026 दुपारी दोनच्या दरम्यान पुणे स्टेशनच्या परिसरामध्ये सेंट्रल हॉटेलच्या मागे मोकळ्या जागेमध्ये बंद गार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्ह्यात वापरलेल्या टू व्हीलर फोर व्हीलर थ्री व्हीलर या गाड्या त्या मोकळ्या जागेमध्ये पार्किंग केल्या होत्या अचानक लागलेल्या आगी मुळे त्या गाड्या पैकी तीन फोर व्हीलर टू व्हीलर जळून खाक झाले आहे प्रथम माहिती अग्निशमन दलाची गाडी एक त्वरित त्या ठिकाणी पोचली असता काही मिनिटांमध्येच अग्निशमन दलाच्या जवानाने आग विझवण्यास यश आले, मोठा अनार्थ कळला जर थोडाही उशीर लागला असता अनेक गाड्या जळून खाक झाल्या असत्या पण अग्निशमन दलाच्या जवानाने शर्तीचे प्रयत्न करून त्वरित आग विझवून मोठी हानी वाचवली आगीचे कारण समजू शकले नाही पुढील तपास बनगार्डन पोलीस स्टेशन करीत आहे



