पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रव्यवसाय-अर्थ

पुनावळ्यात ‘शिलेदार बिर्याणी हाऊस’चे दिमाखात उद्घाटन

आपला राजस्तंभ न्यूज : प्रतिनिधी सुनिल पंदरकर

मराठमोळा दम आणि राजेशाही चवीचा संगम; बिर्याणीप्रेमींसाठी नव्या दालनाची पर्वणी

पुनावळे, दि. ९ ऑगस्ट २०२६ :
पुनावळे परिसरातील बिर्याणीप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी असून, ‘शिलेदार बिर्याणी हाऊस’ या नव्या दालनाचा शुभारंभ रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता विशेष अतिथी, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. युवा नेतृत्व व सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री. अनिलजी ढवळे पाटील यांच्या हस्ते या नव्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दालन पूजन आई आणि वडील यांच्या शुभ आशीर्वादाने पार पडले.
या प्रसंगी शिलेदार बिर्याणी हाऊस परिवाराचे मार्गदर्शक व आधारस्तंभ श्री. विक्रमसिंह पाचपुते, माजी आमदार, श्रीगोंदा तालुका, श्री. विकासजी हांडे पाटील, अध्यक्ष, शौर्य वाडा हॉटेल उद्योग समूह, श्री. तानाजी भाऊ जाधव, संस्थापक-अध्यक्ष, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य, श्री. सुनीलजी पवार साहेब, फाउंडर अँड सीईओ, पवार डेल्टा फोर्स प्रायव्हेट लिमिटेड, श्री. बापूसाहेब जाधव, मुख्य संपादक, दै. आपला राजस्तंभ, अॅड. मयूर दादा पंदरकर पाटील, अध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, श्रीगोंदा, श्री. इमाम सय्यद, फाउंडर अँड सीईओ, आरबीआयएस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, तसेच श्री. गणेशजी ठोकळ, शिवव्याख्याते व इतिहास अभ्यासक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन सोहळ्याला भोईटे पाटील परिवार, जगताप पाटील परिवार, काटे पाटील परिवार, शेलार पाटील परिवार, वाबळे पाटील परिवार, कातोरे पाटील परिवार, थोरात पाटील परिवार, काळे पाटील परिवार, सोनवणे पाटील परिवार, गरुड पाटील परिवार, लाटे पाटील परिवार, निंबाळकर पाटील परिवार, साळुंखे पाटील परिवार, शितोळे पाटील परिवार, ढवळे पाटील परिवार, पवार पाटील परिवार, कापसे पाटील परिवार, फंड पाटील परिवार, गायकवाड पाटील परिवार, देशमुख पाटील परिवार, चव्हाण पाटील परिवार, नलगे पाटील परिवार, कुताळ पाटील परिवार, गुंड पाटील परिवार, जाधव पाटील परिवार तसेच असंख्य मित्रपरिवार आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठमोळ्या चवीचा नवा अध्याय.

‘शिलेदार बिर्याणी हाऊस’च्या माध्यमातून मराठमोळा दम आणि राजेशाही चव या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून बिर्याणीप्रेमींसाठी खास मेजवानी उपलब्ध करून देण्यात आली आहे. साजूक तुपाचा वापर, अस्सल दम पद्धतीने तयार केलेली बिर्याणी आणि पारंपरिक चवीचा संगम ही या दालनाची विशेष ओळख ठरणार आहे. पुनावळे, वाकड, हिंजवडी, रावेत, जांबे आणि ताथवडे परिसरातील बिर्याणीप्रेमींसाठी साजूक तुपातील अस्सल दमदार व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी आणि प्रॉन्स बिर्याणी आता एकाच ठिकाणी उपलब्ध झाली आहे असे प्रतिपादन बिर्याणी हाऊस चे सर्वेसर्व श्री. सुनिल पंदरकर यांनी सांगितले.
पुनावळे येथील शॉप नंबर ३, ढवळे चौक, ढवळे प्रॉपर्टीज, हेरा हॉस्पिटलसमोर, जांबे रोड येथे हे नवीन दालन सुरू झाले आहे.

मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
उद्घाटनप्रसंगी युवा नेतृत्व व सामाजिक कार्यकर्ते श्री. अनिलजी ढवळे पाटील यांनी ‘शिलेदार बिर्याणी हाऊस’ला शुभेच्छा देत, पुनावळेकरांनी या नव्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा आणि साजूक तुपातील अस्सल बिर्याणीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी श्री. सुनीलजी पवार साहेब यांनी आपल्या मनोगतात, “एका मराठी व्यक्तीचा मराठमोळा दम आणि राजेशाही चव घेऊन सुरू झालेला हा बिर्याणी हाऊसचा उपक्रम मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे,” अशा भावना व्यक्त करत ‘शिलेदार बिर्याणी हाऊस’च्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच वर्गमित्र अॅड. मयूर दादा पंदरकर पाटील यांनी मराठी अस्मिता आणि मराठी बाणा जपत सुरू झालेल्या या व्यवसायाचे कौतुक करून ‘शिलेदार बिर्याणी हाऊस’ला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

बिर्याणीप्रेमींसाठी खास आकर्षण
पारंपरिक दम पद्धतीची अस्सल चव, साजूक तुपाचा सुगंध, राजेशाही खाद्यसंस्कृतीची झलक आणि मराठमोळ्या आतिथ्याची जोड यामुळे ‘शिलेदार बिर्याणी हाऊस’ हे पुनावळे परिसरातील बिर्याणीप्रेमींसाठी एक नवे आकर्षण ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
“मराठमोळा दम… राजेशाही चव!” या संकल्पनेतून सुरू झालेल्या या दालनाच्या माध्यमातून चव, दर्जा आणि ग्राहकांचे समाधान यांना प्राधान्य देण्याचा संकल्प शिलेदार बिर्याणी हाऊस परिवाराने व्यक्त केला आहे.
उद्घाटन सोहळ्याला लाभलेली मान्यवरांची उपस्थिती, आप्तेष्टांचा आशीर्वाद आणि मित्रपरिवाराचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे शिलेदार बिर्याणी हाऊसच्या नव्या प्रवासाची दमदार सुरुवात झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button