पुणेमहाराष्ट्र

उत्तमनगरमध्ये महावितरणचा उच्चदाब विद्युत बॉक्स उघडा; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न

उत्तमनगर : प्रतिनिधी, १८ सप्टेंबर २०२६

उत्तमनगर पोलीस चौकीच्या मागील बाजूस असलेल्या घोसावी वस्ती परिसरात, चॉईस बेकरीसमोर महावितरणच्या विद्युत केबलचे काम सुरू होते. काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी उच्चदाब विद्युत बॉक्स व्यवस्थित बंद केला नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

प्रत्यक्ष पाहणीत बॉक्सचे झाकण लॉक न करता त्यावर केवळ दगड ठेवण्यात आल्याचे आढळले. त्यामुळे लहान मुले तसेच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. बॉक्स उघडा राहण्याचे नेमके कारण आणि याबाबत संबंधित विभागाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

काम पूर्ण झाल्यानंतर विद्युत बॉक्स सुरक्षितपणे बंद करून परिसराची पाहणी करणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले. बॉक्स उघडा असल्याने नागरिकांमध्ये नाराजी असून, संभाव्य धोका टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून उच्चदाब विद्युत बॉक्स सुरक्षितपणे बंद करावा. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button