पुणेमहाराष्ट्रराजकारण
प्रभागातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहणार

पुणे कोथरूड: प्रतिनिधी
प्रभागांमधील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी मी कटीबद्ध राहणार,
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार *सौ सुनीताताई विष्णू सरगर*, या प्रभाग क्रमांक 30 ब मधून पुणे महानगरपालिका नगरसेवक या पदासाठी इच्छुक म्हणून आपल्या प्रभागामध्ये उभी आहे प्रभागातील रस्ते, पाणी ,भूमिगत गटारे ,आरोग्य शिक्षण, असे विविध स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे. कोणताही पक्षभेद ,जातीभेद न करता सर्वसामान्य माणूस हाच माझा विकासाचा केंद्रबिंदू राहणार आहे. मी प्रभागांतील बेघर नागरिकांना रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजना यांच्या माध्यमातून बेघर नागरिकांना त्यांचे स्वतःचे घर मिळवून देण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
तसेच प्रभागातील महिलांना चूल मुल पर्यंतच मर्यादित न राहता त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन स्वयंपूर्ण बनवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. माझी प्रभागातील नागरिकांना नम्र विनंती आहे हाताचा पंजा या चिन्हा समोर चे बटन दाबून मत रुपी मला आशीर्वाद देऊन काम करण्याची संधी द्यावी ही विनंती



