पुणे, पिंपरी चिंचवड, आयुक्तालय व ग्रामीण हद्दीतून तडीपार आदेशाचा विनय भंग गुंडास अटक

पिंपरी :प्रतिनिधी
दिनांक 28 फेब्रुवारी तडीपार आदेशाचा भंग करून विनापरवाना पिंपरी चिंचवड आयुकलय हद्दीत प्रवेश केल्याने व लोखंडी कोयता जवळ बाळगल्याने एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई 28 फेब्रुवारी रोजी रात्री साडेसातच्या सुमारास नेहरूनगर रोडच्या बाजूला,एचए ग्राउंड, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे करण्यात आली.
ज्ञानेश्वर आनंदराव भुरे पोलीस शिपाई, संत तुकाराम नगर पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे. पवन सचिन ससाणे (वय 21, रा. सुमेत बुद्ध विहारा जवळ, गांधीनगर, पिंपरी पुणे ) असे अटक करण्यात आली आहे गुंडाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सचिन ससाणे यास पोलीस उपायुक्त परिमंडळ एक यांच्या आदेशाने 17 ऑक्टोबर 2025 रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय , पुणे शहर पोलीस आयुक्तालय , व पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतून दोन वर्षा करिता तडीपार केलेले आहे. आरोपीने तडीपार आदेशाचा भंग करून पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये प्रवेश केला. याशिवाय त्याने धारदार लोखंडी कोयता आपल्याजवळ बाळगून दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबलेला असताना कारवाई करण्यात आली. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार बांबरशे हे अधिक तपास करत आहेत.



